Mumbai Power cut | मुंबई उच्च न्यायालयातील वीजपुरवठा दोन तासानंतर सुरळीत
Continues below advertisement
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वीज पुरवठा सुमारे अडीच तासांनी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दक्षिण मुंबई वरळी, लालबाग, माझगावसह आणि पश्चिम उपनगर, आणि पूर्व उपनगरातील नाहूर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर इथला वीजपुरवठा सुरु झाला आहे. याशिवाय नवी मुंबईतील बेलापूर, खारघर, पनवेल, नेरुळ या भागातील वीजही परतली आहे. याशिवाय तिन्ही मार्गावरील लोकल सेवा, सिग्नल यंत्रणाही पूर्ववत झाली आहे.
Continues below advertisement