MPSC Dates Out | MPSC परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर, परीक्षार्थी उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अखेर विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.