परभणीतील मुरुंबा गावात 900पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू, प्रशासनाकडून गावात कोंबड्यांची विक्री बंद
परभणीच्या मुरुंबा गावात अचानक पणे 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय.पशुसंवर्धन विभागाने गावात भेट देऊन मृत पक्षांचे नमुने पुण्याला पाठवले असुन याचा संसर्ग वाढु नये म्हणून मुरुंबा व आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्री वर प्रशासनाने बंदी घातली आहे. दरम्यान हा प्रकार बर्ड फ्लु ने मृत्यू झालाय की इतर आजाराने हे मात्र पाठवलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याने सध्या तरी घाबरून जाऊ नये असे आवाहनही प्रशासनानं केले आहे