पोलिस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा..., मराठा क्रांती मोर्चाच्या विरेंद्र पवारांचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जी पोलीस दलातील मेगाभरती होणार आहे ती तात्काळ रद्द करावी अन्यथा आम्हांला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. सध्या प्रशासन आम्ही आंदोलन करण्याची भूमिका जरी जाहीर केली तरी आम्हांला रातोरात घरी येऊन त्रास देतं आहेत. आम्हांला नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. त्यामुळे आमचे अधिकार जर आम्हांला मिळणार नसतील. आगामी पोलीस भरतीत जो आमच्या बांधवांना लाभ मिळणार होता. त्यापासून आम्हांला वंचित ठेवणार असतील तर आम्ही जगून तरी काय उपयोग. त्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हांला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीच मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केली आहे.