Monsoon Session विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या तीन ऑगस्टपासून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखेची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 3 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याआधी अधिवेशन 22 जून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 22 जूनला अधिवेशन घेणं शक्य नाही. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर 3 ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.