Aurangabad | औरंगाबादमधील उपळीत वानरांचा हैदौस, 70 माकडं जेरबंद, वनविभागाकडून वानरांचा बंदोबस्त
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या उपळी गावात सध्या वानरसेनेने धुमाकूळ घातलाय. या वानरसेनेच्या मर्कटलिलेमुळे उपळी गावातील नागरिकांचं जगणं मुश्कील झालंय. उपळी या गावात गेल्या काही दिवसांपासून 200 ते 300 वानरांनी मुक्काम टाकलाय. या घरावरून त्या घरावर आणि पत्र्यांच्या घरावरून उड्या मारत वानरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळं लहान मुलं, महिला घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. गावकऱ्यांनी अनेक शक्कल लढवून या वानरांना गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अखेर वनविभागाने वानरांना जेरबंद केलं आहे.