मोदींच्या हत्येचा कट रचल्याचं पत्र रोना यांच्या लॅपटॉपमध्ये प्लान्ट केल्याचा दावा,हायकोर्टात याचिका
Continues below advertisement
मुंबई : शरजील उस्मानीच्या वादग्रस्त विधानांनंतर आता पुन्हा एकदा एल्गार परिषद वादात सापडली आहे. अटकेत असलेल्या एल्गार परिषद कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला होता. असा थेट आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ता रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये ही माहिती मिळाल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. मात्र हा दावा 'ठरवून' केलेला आहे, असा खळबळजनक आरोप करत रोना विल्सन यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात पुणे पोलिसांच्या तपासालाच आव्हान दिलं आहे. हा कॉम्प्युटरच हॅक करण्यात आला आहे आणि त्यामध्ये क्लोन कागदपत्रं तयार करण्यात आली आहेत. स्पष्ट झालंय, असा दावाही या याचिकेत केला आहे. त्यामुळे हॅकरविरोधात कठोर कारवाई करावी. सर्व आरोपींची तत्काळ मुक्तता करावी आणि सर्व गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement