Corona Vaccine | गुड न्यूज...! अमेरिकेत कोरोनावरील लसीची चाचणी अंतिम टप्प्यात
Continues below advertisement
मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग जेरीस आलं आहे. अशातच अनेक देश या महामारीपासून बाहेर पडण्यासाठी व्हायरसवर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक दिवस-रात्र एक करुन लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच अमेरिकेतील मॉडर्ना या औषध बनवणाऱ्या कंपनीच्या दाव्यामुळे लसीबाबतची अपेक्षा वाढवली आहे. मॉडर्नाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. सकारात्मक निष्कर्षाच्या माहितीनंतर अमेरिकी शेअर बाजारात मॉडर्नाच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Continues below advertisement