Majha Maharashtra Majha Vision | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार नाही - राज ठाकरे

Majha Maharashta Majhe Vision | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम होत आहे. पहिल्या सत्रात राज ठाकरे यांनी आपलं व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी कोरोना संकट, सरकारचा कारभार, मनसेची भूमिका यावर मत व्यक्त केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola