मुंबईत आमदार राम कदमांचं बंगाल बचाओ आंदोलन, नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचे मुंबईत पडसाद
नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर काल बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. केंद्रातल्या भाजप सरकारनं याबाबत गंभीर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बंगालची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरु आहे का असाही सवाल उपस्थित होतोय.
आगीशी खेळू नका...माफी मागा...हा इशारा आहे राज्यपालांनी एका मुख्यमंत्र्यांना दिलेला..फार क्वचित वेळा असं होतं की खुद्द राज्यपाल पत्रकार परिषद घेऊन असा आरोप करतात. पण बंगालमध्ये जो धुडगूस सुरु आहे. त्यामुळे राज्यपाल जगदीप धनखड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर काल दगडफेक झाली. नड्डा यांची गाडी बुलेटप्रुफ असल्यानं त्याचं नुकसान झालं नाही. पण भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीवर पडलेल्या दगडविटांची दृश्यं टीव्हीवर दिसली.