Rajawadi Missing Dead-body | मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातील 'तो' गायब मृतदेह सापडला

Continues below advertisement

मुंबई : मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातून चक्क एक मृतदेह गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हा मृतदेह शवागरातच पडून होता आणि अखेर काल त्या मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईकांकडे अंतिमविधीसाठी देण्यात ही आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस तपास करत होते.


गोवंडी येथे रहाणाऱ्या मेहराज एजाज अहमद शेख या तरुणाची त्याच्याच नातेवाईकांनी आपसातल्या भांडणातून 3 तारखेला हत्या केली होती. जखमी अवस्थेत त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नाही. मृतदेहाची कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचे रुग्णालयाने नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram