मिरजमधील बेघर केंद्रात वाढलेल्या कार्तिकीचा कौटुंबिक आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह! स्पेशल रिपोर्ट
सांगलीतील मिरजमध्ये आठ महिन्यांपासून अनाथ असलेल्या आणि बेघर निवारा केंद्रात लहानाची मोठी झालेल्या एका मुलीचा लग्नसोहळा सत्यशोधक पध्दतीने लावून देत अनोखा आदर्श घालुन देण्यात आलाय. चि. सौ.का.कार्तिकी असे वधुचे नाव असून तिने अनाथ असल्याने आपला विवाह साध्या पध्दतीने का होईना पण कौटुंबिक वाटावा असा साजरा झाल्याचा मोठा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मिरज मधील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये हा विवाह सोहळा आस्था बेघर महिला निवारा केंद्र, डॉ.परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. विनोद परमशेट्टी , मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकारातुन संपन्न झाला.