Ramvilas Paswan Passes away | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं दिल्लीत उपचारादरम्यान निधन
Continues below advertisement
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. "पप्पा... तुम्ही या जगात नाहीत पण मला माहित आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात' असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.
Continues below advertisement
Tags :
Minister Ramvilas Paswan Minister Ramvilas Paswan Ramvilas Paswan Death Death News Ramvilas Paswan Death