MIM Mumbai Rally : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील अखेर मुंबईत दाखल : ABP MAJHA
Continues below advertisement
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील अखेर मुंबईत दाखल झालेयत... मानखुर्द, वाशी, खारघरमध्ये पोलिसांकडून समजवण्याचा प्रयत्न केला गेला... मात्र इम्तियाज जलील हे मोर्चा काढण्यावर ठाम होते... तर मानखुर्दमध्ये जलील यांच्याकडे असलेला तिरंगा झेंडा काढण्यास सांगण्यात आला... मात्र तरीही जलील तिरंगा झेंडा घेऊनच जाणार यावर ठाम होते... थोड्याच वेळात इम्तियाज जलील हे मुंबईच्या चांदिवलीतील सभास्थळी दाखल होतील... आणि त्यांच्या सभेला सुरुवात होईल... तर यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित राहणार आहेत... या सभेत आता काय बोलणार मुंबईत कोणावर तोफ डागणार पाहणं महत्त्वाचं असणारेय...
Continues below advertisement
Tags :
Mumbai Police मुंबई पोलिस Mankhurd मानखुर्द Kharghar Vashi वाशी खारघर मुंबई पोलिस इम्तियाज जलील Imtiaz Jalil Of MIM