Milk Rates Maharashtra | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार- दुग्ध विकास मंत्री सुनील केदार
Continues below advertisement
आजच्या बैठकी मध्ये अनेकांनी दुधाला दर लिटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. तसेच दूध भुकटीला 50 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. न्यूझीलंडसारख्या देशातून भारताने दूध भुकटी आयात केली यालाही बैठकीत विरोध दर्शविण्यात आल्या. मंत्री सुनिल केदार यांनी आज विविध सरकारी आणि खाजगी दूध संघांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्या. तसंच यासाठी सरकार नवीन योजना आणणार असल्याचे सूतोवाच देखील केले. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करू असे सांगितले.
Continues below advertisement
Tags :
Dairy Development Milk Rates Constant Lockdown Milk Rates Milk Industry Milk Rates Milk Producers Sunil Kedar Milk Production