Ducks in Uran | युरोप, सैबेरियातून पक्ष्यांचं स्थलांतर, उरणमध्ये लालसरी आणि नयनसरी बदकांचं दर्शन!

Continues below advertisement

मुंबई लगतच्या उरणमध्ये लालसरी आणि नयनसरी बदकांचं दर्शन झालंय. त्यामुळे पक्षी निरीक्षकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.. युरोप आणि सायबेरियातून हे पक्षी उरणमधील पाणथळ जागेत स्थलांतरीत होत आहेत. उरणच्या या परिसरात पक्षांच्या अडिचशेपेक्षा अधिक प्रजाती आढळून येतात. यात आता लालसरी आणि नयनसरी यांची देखील भर पडलीय. मोठी लालसरी हा मध्यम आकाराचा पक्षी असून त्याची लांबी ही ५०  ते  ६० सेंटीमीटर असते. तर, नयनसरी ह्या बदकांची लांबी ही ३५ ते ४० सेंटीमीटर असते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram