नागपूरच्या कामठी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर परिचारिकेला कोरोना
नागपूर जिल्ह्यातील कामठी उपजिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आल्या आहेत. संबंधित परिचरिकेला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या टप्प्यातच लसीकरण झाले होते. 42 वर्षीय परिचारिकेने जानेवारी महिन्यात कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विहित वेळी त्यांना लसीचा दुसरा डोज ही देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या.