Mumbai mayor Kishori Pednekar : महापौर किशोरी पेडणेकर यांचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र
Continues below advertisement
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांबद्दल भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगानं दखल घेतली. मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. तर तिकडे शिवसेना महिला आघाडीही पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. त्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज दुपारी कायदा-सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांची भेट घेणार आहे. वरळीतील सिलेंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करताना आशिष शेलारांनी टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप होतोय.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Shiv Sena Mumbai Police Rupali Chakankar मुंबई BJP Leader शिवसेना Vishwas Nangre Patil भाजप नेते मुंबई पोलिस Mayor महापौर आशिष शेलार Ashish Shelar Kishori Pednekar किशोरी पेडणेकर State Women's Commission महापौर Women's Front