Marathi Language Row | हिंदी सक्तीविरोधात मराठी मोर्चा; ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून निघणार
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोठा मोर्चा निघणार. मोर्चात कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठी माणसाचा मोर्चा असेल असे स्पष्ट केले. चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक, वकील यांना सहभागी होण्याचे आवाहन. 'महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा कट उध्वस्त करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे' असे आवाहन केले.