Marathi Language Controversy | 'मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा'- Sushil Kedia
Continues below advertisement
राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भव्य मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. अशा या तापलेल्या परिस्थितीत सुशील केडिया नावाच्या एका गुंतवणूक तज्ञाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. सुशील केडिया यांनी "मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा" अशी एक पोस्ट करत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना ती टॅग केली आहे. केडिया यांनी आपल्या ट्विटमध्ये चिथावणीखोर भाषा वापरली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचंय ते बोला." सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचत नेमकी काय पोस्ट केली आहे, ती सुद्धा त्यांनी स्पष्ट केली आहे. केडियांच्या पोस्टमध्ये नमूद आहे की, "राज ठाकरे नीत ऐका, मुंबईत तीस वर्षे राहूनही मला मराठी व्यवस्थित लिहीत नाही. तुमच्यासारख्या अरेरावी करणाऱ्या माणसाला मराठीचा मक्ता जोपर्यंत दिला गेलाय, तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की मी मराठी शिकणार नाही. काय करायचंय ते करा." या पोस्टमुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरील वाद आणखी वाढला आहे.
Continues below advertisement