#MarathaReservation Council | मराठा आरक्षणासाठीचे पर्याय काय? मराठा आरक्षण सद्यस्थितीवर एबीपी माझाची महापरिषद | भाग 2
मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने खास मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे.
Tags :
Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation