Maratha Protestors Arrested | मराठा आंदोलकांचा CSMT परिसरात ठिय्यास, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement
मुंबई : आजपासून मुंबईत सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, तसंच अधिवेशनाच्या अल्प कालावधीवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच अधिवेशनाच्या कामकाज सुरु होतात, फक्त दोन दिवसांचंच अधिवेशन का असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या घोषणांची पूर्तता कधी होणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी बॅनर घालून सभागृहात हजेरी लावली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram