Maratha Community | आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू नाही, शासनाचा निर्णय

Continues below advertisement
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू असणार नाही. राज्य शासनाने तसे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे दुहेरी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असा शासनाचा आदेश आहे. केंद्र शासनाच्या सेवांमधील प्रवेशासाठी मात्र मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल, असे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा किंवा सोयीसुविधांचा फायदा दिला जात नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत घटकांचा त्यात समावेश होतो, शासनाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram