#Corona मानखुर्द वसतीगृहातील 29 गतिमंद मुलांना कोरोना, चिल्ड्रन्स होममध्ये कसा पोहोचला कोरोना?

Continues below advertisement

चिल्ड्रन्स होम सोसायटी'येथील व्यवस्थापनाने दोन आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेशी संबंध साधून काही मुलांना खोकला असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी फिव्हर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये एकूण 268 मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. त्यातील 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील दोन मुलांना टीबी आहे, त्यांच्यावर सायनच्या 'लोकमान्य टिळक’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित 28 मुलांना बीकेसी, बांद्रा येथील कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सर्व खबरदारी घेतली जात आहे. चिल्ड्रन्स होम मध्ये कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram