Mandar Devsthali EXCLUSIVE | थकीत मानधनाबद्दल कलाकारांच्या आरोपांवर मंदार देवस्थळींचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
अभिनेत्री मृणाल दुसनिस, शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर आणि अभिनेता संग्राम समेळ या चौघा कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर थकीत मानधनाबद्दल एक पोस्ट शेअर केली. हे मन बावरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या कलाकारांचा रोख होता तो निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर. मराठी इंडस्ट्रीत सहसा कोणी कुणाला असं पब्लिकली बोल लावत नाही. देवस्थळी यांच्यासारख्या अनुभवी बड्या निर्मात्याला तर नाहीच नाही. पण असं काय झालं की या कलाकारांनी असं टोकाचं पाऊल उचललं? यापूर्वी हीच नाराजी त्यांनी देवस्थळी यांच्याकडे बोलून दाखवली होती का? या कलाकारांशी बोलल्यानंतर त्यांनी त्यांची बाजू 'एबीपी माझा'समोर मांडली आहे.
Continues below advertisement
Tags :
Vidisha Mhaisakar Mrunal Dusanis Sangram Samel Man He Bawre Shashant Ketkar Mandar Devasthali Sharmistha Raut Marathi Actor