Majha Katta Usha Nadkarni | सुशांत, नेपोटिझम ते बिगबॉसमधील किस्से, उषा नाडकर्णींसोबत मनमोकळ्या गप्पा
मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये हिंदी कलाकारांसारखीच वागणूक दिली जाते. मात्र, भेदभाव केला जातो तो मानधन देताना. मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांच्या तुलनेत अतिशय कमी मानधन दिले जात असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. उषा नाडकर्णी ह्या माझा कट्टा या कार्यक्रमात आल्या होत्या.
तुसडी, विक्षिप्त, कजाग, कारस्थानी, कपटी, खुनशी, फटकळ, भांडकुदळ, कुचकी, खवचट, खाष्ट, खडूस अशी कितीतरी विशेषणे पडद्यावर तोऱ्यात मिरवणारी अणि मराठीसकट हिंदीतल्या व्हिलन्सची बाप ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आज माझा कट्टा कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली.
Tags :
Usha Nadkarni Majha Katta Senior Actress Pavitra Rishta Usha Nadkarni SSR Abp Majha Katta Marathi Actress Majha Katta