Mahatma Gandhi Statue : पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार, विटंबना करण्याचा प्रयत्न
पुणे रेल्वे स्टेशनसमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची एका माथेफिरूने विटंबना करण्याचा प्रयत्न केला. हातात कोयता घेऊन सुरज शुक्ला नावाचा व्यक्ती पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढला होता. त्याने पुतळ्याच्या पायावर आणि छातीवर वार केले. तसेच पुतळ्याचे डोकं छाटण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला पकडले आणि रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी सुरज शुक्लाला ताब्यात घेतले आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. सुरज शुक्ला कोणत्याही संघटनेचा सदस्य आहे का किंवा कोणत्याही संघटनेशी संबंधित आहे का, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. मंदार गुंजर यांनी या घटनेची माहिती दिली.