WEB EXCLUSIVE : महिन्याभरातच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
लहान मुलांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. कोरोनाची तिसरी लाट तोंडावर येऊन ठेपली असताना, देशभरातील लहानग्यांवर कोरोना लसीची चाचणी पार पडली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच लहान मुलांच्या लसीकरणाला देखील सुरुवात होऊ शकते. झायकोव-डी (ZyCov-D) नावाची ही लस असून अहमदाबादच्या झायडस कॅडीला (Zydus Cadilla) कंपनीने याची निर्मिती केली आहे. पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली. पैकी एका ही मुलाला कोणताही त्रास झालेला नाही, असा दावा हॉस्पिटलने केलाय. ही लस नेमकी कशी आहे, ती कशी टोचली जाणार, त्याची निर्मिती कुठपर्यंत आली आणि प्रत्यक्षात हे लसीकरण कधी सुरू होईल, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.
Continues below advertisement