Junnar Wedding : Zilla Parishad सदस्याच्या मुलाचं दणक्यात लग्न, 200 ची परवानगी हजारोंची गर्दी

Junnar : शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनीच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासलाय. लग्नकार्यात प्रशासनाकडून 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी असतानाही लांडे यांच्या मुलाच्या लग्नात तब्बल हजाराहून अधिक वऱ्हाडींची उपस्थिती दिसली. यावेळी डीजेच्या तालावरही अनेकांनी ठेका धरला. त्यामुळे याप्रकरणी आता जुन्नर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवलेत. 28 ऑगस्टला म्हणजेच परवा हा लग्न सोहळा पार पडला. यावेळी जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेसुद्धा उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola