Zero Hour : नरेंद्र मोदी ते डोनाल्ड ट्रम्प, संजय राऊतांचा हल्लाबोल : Sanjay Raut Exclusive ABP Majha
Zero Hour : नरेंद्र मोदी ते डोनाल्ड ट्रम्प, संजय राऊतांचा हल्लाबोल : Sanjay Raut Exclusive ABP Majha
केंद्र सरकारने (Central Government) संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रीलचे (Mock Drill) निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी उद्या बुधवारी (दि. 7) करणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानने किंवा दहशतवाद्यांनी आमच्या 27 लोकांचा बळी घेतला. त्या संदर्भात प्रतिकार किंवा बदला काय? हा प्रश्नच आहे. दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत. आपल्याला जपानने पाठिंबा दिला आहे. पुतीनने पाठिंबा दिला आहे, अशा चर्चा आहेत. उद्या जनतेचा युद्धसराव आहे. आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्धसराव अनेक देशांमध्ये होत असतो. विशेषतः ज्या देशांना सातत्याने युद्धाची भीती असते त्यांना युद्धसराव करावा लागतो. जनतेला त्यात सहभागी करून घ्यावे लागते. भारतामधील जनता तेवढी अज्ञानी नाही. 1971 सालची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे. तेव्हा दळणवळणाची साधने देखील कमी होते. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं पण त्यापेक्षा मोठे युद्ध आपण लढलो ते म्हणजे कोरोनाचे युद्ध. भारताची जनता ही मानसिक दृष्ट्या मजबूत आहे.