Zero Hour With Sarita Kaushik : जे बारामतीत घडलं तेच कर्जत-जामखेडमध्ये घडणार का? ABP Majha

Continues below advertisement

Zero Hour With Sarita Kaushik : जे बारामतीत घडलं तेच कर्जत-जामखेडमध्ये घडणार का? ABP Majha
बारामतीत सुनेत्रा पवार उमेदवारी देण्यास दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा असं ट्विट रोहित पवारांनी केलं होतं यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिले आहे. जयच्या उमेदवार संदर्भात त्यांच्याच कार्यकर्ते अजित पवारांना भेटले तर अजित पवारच पार्टीचे अध्यक्ष आणि तिथले आमदार आहे. जय हा त्यांचा मुलगा आहे त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात हे येत्या काळात कळेल अस रोहित पवारांनी म्हटलंय. तसेच त्यांचे कार्यकर्ते म्हणतात दादा तुम्ही थांबा आणि जयला संधी द्या त्यामुळे हा त्यांच्या अंतर्गत विषय असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तर मी विचारायला पक्का आहे त्यांच्याकडे आर्थिक आणि मसल पावर असेल तसेच बारामती मतदारसंघात त्यांनी गुंडांचा वापर केला मात्र इथल्या सामान्य कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे त्यामुळे कोणी उभा राहिले तरी मला भीती नाही अस विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. जर भाजपने खरंच घरा घरात भांडण लावली असेल तर इथला नीकाल हा आश्चर्यजनक असेल अस सूचक व्यक्तव्य देखील रोहित पवारांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram