Zero Hour Lok Sabha Elections : पवार, ठाकरे, मोदी ते शिंदे; निवडणूक कुणासाठी सर्वाधिक महत्वाची?

Continues below advertisement

महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक संपली.. देशात आणखी दोन टप्प्यांचं मतदान व्हायचंय.. यंदाची लोकसभा राज्यातल्या राजकीय भविष्याला कलाटणी देणारी ठरणारय.. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस.. असे सहा प्रमुख पक्ष मैदानात होते.. आणि प्रत्येकासमोर बरीच आव्हानं होती.. महत्वाचं म्हणजे फक्त पक्षांसाठीच नव्हे तर या निवडणुकीत अनेक नेत्याचं अस्तित्वही  पणाला लागलंय आणि त्यामुळेच कि काय जागावाटपाचा घोळ.. उमेदावार निवडीचा गोंधळ.. बंडखोरी.. नाराजी.. प्रचंड दावेदारी ... पक्ष, नेत्याशी निष्ठेचा कस ... यातून महायुती आणि महाविकासआघाडी असे दोघांनाही मार्ग काढावा लागला. त्यातून मतदारांमध्येही कमालीचा गोंधळ, संभ्रम आणि संशय होता. त्यामुळेच की काय इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात मतदानाचा टक्काही घसरल्याचं दिसलं. पहिल्या तीन टप्प्यात एकूण त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर, बासष्ट पुर्णांक एकाहत्तर आणि त्रेसष्ट पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं. तर चौथ्या टप्प्यातही मतदान सर्वात कमी म्हणजे बासष्ट पूर्णांक एकवीस टक्के मतदान नोंदवलं गेलं.. आणि आता आज पार पडलेल्या पाचव्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अवघं अठ्ठेचाळिस पुर्णांक सहासष्ठ टक्केच मतदान झालंय. अद्यापही अनेक भागात मतदार रांगेत उभे असल्यामुळे, पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. आजच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी आणि नाशिकमध्येही मतदान झालंय. त्याशिवाय मुंबई उपनगरातील दहा जागांचा समावेश होता. इथे जास्तीत जास्त टसल ही उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना किंवा उद्धव सेना विरुद्ध भाजप अशी होती. निकालासाठी संपूर्ण देशालाच 4 जूनची प्रतिक्षा करावी लागणारय.. त्यामुळे पुढचे चौदा दिवस उमेदवारांसह प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाची धाकधूक सुरुच राहिल. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बालेकिल्ला ठाणे राखण्यासह मुलगा श्रीकांतला कल्याणमधून जिंकवून आणण्याचं आव्हान आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरेंना आपला ब्रँड कायम राहण्यासाठी उपनगरात मोठं यश मिळवावं लागणारय.. सीटिंग उमेदवार बघितले तर मुंबईतील १० जागांपैकी २ उमेदवार उद्धव सेनेकडे, ५ उमेदवार भाजप तर ३ उमेदवार शिंदे सेनेकडे आहेत. त्याच मतदानाचं प्रत्येक विभागवार विश्लेषण करायचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram