Zero Hour Ujjwal Nikam : ऑनर किलिंग करणाऱ्यांवर कोणती कारवाई? उज्ज्वल निकम गेस्ट सेंटरमध्ये
Zero Hour Ujjwal Nikam : ऑनर किलिंग करणाऱ्यांवर कोणती कारवाई? उज्ज्वल निकम गेस्ट सेंटरमध्ये
गेल्या आठ दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टींवर आता आपण चर्चा कऱणार आहोत.. जुलै महिना .... चार ठिकाणं... चार गुन्हे... चार हत्या.... कारणं दोन.. पहिलं कारण... नकार ..... आणि तो नकार न सहन करण्याची मानसिकता.. उरणची यशश्री शिंदे... सांगलीतून पिंपरीत शिकण्यासाठी आलेली प्राची माने... नवी मुंबईतली अक्षता म्हात्रे.. आणि संभाजी नगरमधला अमित साळुंखे... हे चारही जण आज आपल्यात नाहीएत... आता ते आज आपल्यात का नाहीएत... कारण चौघांच्याही हत्या करण्यात आल्यात... आणि आश्चर्य म्हणजे त्यातील तिघांच्या हत्येचे कारण आहे प्रेम .... उरणच्या यशश्रीची प्रेमाच्या नावाखाली हत्या केली.... तर सांगलीच्या प्राची मानेचा एकतर्फी प्रेमातून. संभाजी नगरचा अमितने प्रेम करून लग्न केले म्हणून ठरला ऑनर किलिंगचा बळी..ह्या तिघांच्या व्यतिरिक्त नवी मुंबईतील अक्षताची हि हत्या झाली ... तर त्याला कारण ठरला सामुहिक अत्याचार.