Zero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?

Continues below advertisement

Zero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?

जगातली एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष बनणार हे आता स्पष्ट झालं आहे. २० जानेवारी २०२५ रोजी ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेच्या निवडणुकीकडे नेहमीप्रमाणं सर्व जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस ही चर्चा अनेक घरांमध्ये, कार्यालयांमध्ये.. एवढंच काय तर गावाच्या चावडीवरही रंगली होती. सतत वाढणारी महागाई, बेरोजगारी, अन्य देशांमधून येणारे स्थलांतरित, बेकायदेशीररित्या सीमा ओलांडून येणारे मेक्सिकन नागरिक, ड्रग्जची समस्या... अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली. अमेरिकेतील दरडोई उत्पन्न हे भारताच्या तुलनेत ३२ पटीनं जास्त आहे. मग तिथल्या लोकांना महागाईची झळ कशी बसते, असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण अर्थकारण तसं चालत नाही. एक तर दरडोई उत्पन्न हा सरासरी आकडा असतो, आणि दुसरं म्हणजे अनेक देशांमध्ये नागरिकांचं उत्पन्न जास्त असलं तरी तिथलं राहणीमानही तितकंच महाग असतं. त्यामुळं महागाई आणि बेरोजगारीचा फटका अनेक अमेरिकन नागरिकांना बसतोय, हे नाकारता येणार नाही. 

दरम्यान या निकालाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर कसा होईल, तुमच्या खिशाला यामुळे अधिक झळ बसेल का हे सगळं आपण आजच्या झीरो अवरमध्ये पाहणार आहोत. 
-----------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram