Zero Hour : पक्ष नेत्यांसमोर Vishwajeet Kadam यांची उघड नाराजी, विश्वजीत कदमांचा ठाकरेंना इशारा

Continues below advertisement

Zero Hour : पक्ष नेत्यांसमोर Vishwajeet Kadam यांची उघड नाराजी, विश्वजीत कदमांचा ठाकरेंना इशारा
सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यानं.. आणि त्यातही विश्वजीत कदमांच्या भाषणानं..
राजकीय कुस्ती केवळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच रंगलीय असं नाही.. तर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये अद्यापही सांगलीच्या आखाड्यात धुरळा उडतोय.. निमित्त आज पार पडलेला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा.. इथे उबाठा सेनेला जागा सोडली, विशाल पाटीलांना उमेदवारी मिळाली नाही, विश्वजित कदम नाराज झाले ... काँग्रेसने बरेच हि जागा आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न केले वगैरे वगैरे आपण बघितले ... पण शेवटी काँग्रेस नेत्यांनी हि जागा उबाठा गटाची असे म्हणत, मन मारून घेतले ... पण विश्वजीत कदमांनी मात्र आज ह्या मेळाव्यात स्टेजवरून काँग्रेसचा गड ठाकरेंकडे गेल्यानंतर, कार्यकर्त्यांपुढे पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.. तेही स्टेजवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण बसलेले असताना.. तर बेधडकपणे थेट उद्धव सेनेला इशारा हि देऊन टाकला. एवढ्यावरच ते गप्प बसले नाहीत.. तर पक्ष नेतृत्वाच्या समक्ष, कार्यकर्त्यांसमक्ष त्यांनी नेतृत्वावर हि तोंडसूख घेतलं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram