Zero Hour : Rajendra Raut विरुद्ध Manoj Jarange यांच्यात शाब्दिक वाद, मराठा समाज कुणाच्या पाठिशी?

Continues below advertisement

Zero Hour : Rajendra Raut विरुद्ध Manoj Jarange यांच्यात शाब्दिक वाद, मराठा समाज कुणाच्या पाठिशी? 

मनोज जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून मॅनेज होतंय,  आमदार राजेंद्र राऊत यांचा आरोप,  जरांगेंच्या आंदोलनस्थळावर रोहित पवारांची टीम आधी पोहचते, आमदार राऊत यांचा दावा. आता आपण पाहणार आहोत मराठा आंदोलक मनोज जरांगेसंदर्भातील दोन महत्वाच्या बातम्या... ज्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचंही टेन्शन वाढू शकतं...
सुरुवात बार्शीतून..गेले काही दिवस बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात मराठा आरक्षण प्रश्नावरुन जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे.. महायुती समर्थक आमदार राजेंद्र राऊत.. ज्यांना राजा राऊत म्हणूनही ओळखलं जातं.. त्यांनी मनोज जरांगे यांच्या वागण्या-बोलण्याबाबत.. जरांगेंच्या कार्यपद्धतीबाबत काही आक्षेप घेतले होते.. जरांगेंना कायदेशीर पेच लक्षात घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात रस नसल्याचं सांगत, जरांगेंची भूमिका महाविकास आघाडीला पूरक आहे असा आरोप त्यांनी केला होता.. जरांगेच्या आंदोलनामागे शरद पवार, रोहित पवार असल्याचा आरोपही केला होता. त्याला जरांगेंनी आपल्या शैलीत आणखी आरोप करत प्रत्युत्तर दिलं होतं.. .राजेंद्र राऊत देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुन आरोप करत आहेत असा आरोप जरांगेंनी केला.. त्यातच जरांगे समर्थकाला राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आणि वादाची आग आणखी भडकली. एक मात्र नक्की ... या निमित्ताने पहिल्यांदाच एक मराठा आमदार मनोज जरांगेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभा करताना दिसत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram