Zero Hour : नागपुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता, भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे
Continues below advertisement
Zero Hour : नागपुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता, भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे
बातमी महायुतीची चिंता वाढवणारी... भाजपने विदर्भात केलेल्या सर्व्हेत महायुतीला केवळ २५ जागा मिळत असल्याचं समोर आलंय. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत, त्यातील ३९ जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभेत केवळ २५ जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्ह्यात भाजपला १२ पैकी केवळ ४ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत दिसतंय. विदर्भाचा विचार केला तर भाजपला १८, शिवसेनेला ५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत दिसतंय.
Continues below advertisement