Zero Hour : मिशन दक्षिण भारतासाठी भाजपकडे नवा मुद्दा

Continues below advertisement

जशी वैयक्तीक जीवनात महत्वाकांक्षा गरजेची असते तशीच ती सामाजिक-राजकीय जीवनातही गरजेची असते. उदात्त विचारांची बैठक आणि योग्य मार्गांचा वापर करणारा असेल तर मोठं यश मिळतं आणि जास्तीत जास्त लोकांचं हीत सुद्धा यातून साधलं जातं. फक्त महत्वाकांक्षेचं रुपांतर अतिमहत्वाकांक्षेत झालं किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षा जास्त हावी ठरली तर सगळं गणित बिघडायला वेळ लागत नाही. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात आपल्याला महत्वाकांक्षेचे सर्व प्रकार पाहायला मिळाले. मी पुुन्हा येईन ही देेवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षा होती, त्यासाठी त्यांनी मेहनतही घेतली आणि शिवसेनेसोबत १४५ चा आकडा सहज पार केला.. मात्र त्याचवेळी ठाकरेंची-पवार-राऊतांची महत्वाकांक्षा जागी झाली, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची, आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपदाची महत्वाकांक्षा खुणावू लागली.. पाच वर्ष सत्तेच्या बाहेर असलेल्या आणि आणखी ५ वर्ष सत्तेबाहेर राहण्याचा जनतेचा कौल मिळालेल्या शरद पवारांना ठाकरेंच्या मदतीने सत्तेत परत येण्याची महत्वाकांक्षा खुणावू लागली.. ठाकरे-पवारांच्या समीकरणामुळे गलितगात्र आणि जनतेनं ४४ जागा देत सत्तेबाहेर भिरकावलेल्या काँग्रेसला सत्ताकांक्षेनं भूरळ घातली.. या तिघांसाठीही एक कॉमन कॉज होतं ते म्हणजे बहुमत मिळवलेल्या भाजप आणि देवेंद्र फडणवीसांची सत्ता सिंहासनाची वाट रोखणं.
त्यांनी मविआच्या माध्यमातून ते साध्य केलं. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांनी उचल खाल्ली आणि त्यामुळे पुढे काय झालं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. कुणाला आमदार व्हायचंय कुणाला खासदार, कुणाला मंत्री व्हायचंय कुणाला मुख्यमंत्री, राजकीय महत्वाकांक्षांचा हा खेळ असाच सुरु राहणार आहे. याला थोडीशी सामाजिक महत्वाकांक्षेची जोड लावली तर नेत्यांचा स्वार्थही साधेल आणि परमार्थही साधेल. तेवढा विचार करण्याचा वेळ त्यांना मिळो ही प्रार्थना.
झीरो अवरमध्ये वेळ झालीय एका छोट्या ब्रेकची.. ब्रेकनंतर.. भाजप, हिंदूत्व आणि राष्ट्रवाद ((किंवा 
काँग्रेसच्या काळात कच्चथीवू बेट श्रीलंकेला गिफ्ट केलं, भाजपचा आरोप))

मिशन दक्षिण भारतासाठी भाजपकडे नवा मुद्दा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram