
zero hour : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजित पावारांवर निशाणा, महायुतीत खडा पडणार?
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून ३२ जागा दूर राहिलेल्या भाजपाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आले आहे. ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे ऑर्गनायझर लेखात म्हटले आहे.
Continues below advertisement