Zero Hour : पावसाळी अधिवेशनात आरक्षणावरून गोंधळ ते वरळी हिट अँड रन प्रकरण; झीरो अवरमध्ये सविस्तर
Zero Hour : पावसाळी अधिवेशनात आरक्षणावरून गोंधळ ते वरळी हिट अँड रन प्रकरण; झीरो अवरमध्ये सविस्तर आजच्या भागात आपण दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचं सखोल विश्लेषण करणार आहोत... सुरुवात महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानं करुयात.. राज्याचं असो की केंद्राचं.... प्रत्येक अधिवेशनात गोंधळ होतोच.. प्रश्नोत्तर होतात.. पण, साधारणात: विरोधकांकडून घोषणाबाजी.. गोंधळ केल्याची घटनांचं प्रमाण जास्त असतं.. मात्र, आज नेमकं उलटं झालं.. दुपारी बारा वाजता विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला.. त्याची सुरुवात केली सत्ताधारी आमदार अमित साटम यांनी.. त्यांच्यासोबतच आमदार आशिष शेलार आणि सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार आरोप केले.. आणि त्याला कारण ठरली कालची सर्वपक्षीय बैठक... काल राज्य सराकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यात राज्यातल्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार होती. विरोधी पक्षांचे प्रमुखही याच बैठकीला येणार होते.. मात्र, संध्याकाळी ऐनवेळी विरोधकांनी भूमिका बदलली आणि बैठकीला दांडी मारली.. हाच मुद्दा केंद्रस्थानी घेवून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ केला.. पुढे दोन्ही सभागृहात काय काय घडलं सांगणार आहोच.. मात्र, त्याआधी पाहुयात.. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले गंभीर आरोप...