Zero hour Pooja Khedkar : पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट, कागदपत्र 'माझ्या' च्या हाती
Zero hour Pooja Khedkar : पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट, कागदपत्र 'माझ्या' च्या हाती
वादग्रस्त आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकरांना (Pooja Khedkar) दिलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट आहे का? अशी शंका उपस्थित करणारी, किंबहुना त्यावर शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रे एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. ज्यांच्या सहीने हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र पूजा खेडकरांना देण्यात आलंय. ते वायसीएमचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे यांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र त्यांनी हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही असा दावा केलेला आहे. परंतु अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीस्टने तपासणी दरम्यान जे नमूद केलं, ती कागदपत्रे एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. यात ऑर्थोची तपासणी शिकाऊ डॉक्टरांनी कशी काय केली? तर तपासणीवेळी फिजिओथेरपीस्टना डाव्या गुडघ्यात इजा आढळलीचं नाही, तरी अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले? असे प्रश्न या कागदपत्रांमुळं उपस्थित झालेत.