Zero hour on Today Match : अश्विन भारताचा यशस्वी गोलंदाज, सहा कसोटी शतकांसह 3503 धावा

Continues below advertisement

Zero hour on Today Match : अश्विन भारताचा यशस्वी गोलंदाज, सहा कसोटी शतकांसह 3503 धावा

 भारताच्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या रविचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या 38 व्या वर्षी अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या मध्यावर त्याने निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला चकित केले.R. Ashwin

रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीतून बाहेर पडला. गाबा टेस्ट दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीरशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली. अश्विन आता ऑस्ट्रेलियात राहणार नसल्याची माहिती रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिली. ते गुरुवारी भारतात परतणार आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram