Zero Hour on Chhagan Bhujbal : मला खेळणं समजले का? भुजबळ आक्रमक, अजित पवारांवर संतापले

Continues below advertisement

Zero Hour on Chhagan Bhujbal : मला खेळणं समजले का? भुजबळ आक्रमक, अजित पवारांवर संतापले

महायुती सरकारचा रविवारी मंत्रीमंडळ विस्तार पाडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेकांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाला आहे. दरम्यान काही आमदारांना डावलल्याने राज्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने भुजबळ समर्थकांनी राज्यभरात नाराजी व्यक्त केली आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भुजबळ यांचे जे काही आक्षेप असेल ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलून सोडवावेत. ओबीसी वर अन्याय केला जातोय हे चित्र दाखवलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram