Zero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha


Zero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha 

महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या राजकीय उलथापालथी पाहिल्यात.. इतकी राजकीय चिखलफेक पाहिलीय.. की कोणत्याही मंचावर जेव्हा राजकीय नेते असतात.. तेव्हा तो मंच साहित्य संमेलनाचा असो की पुरस्कार प्रदान सोहळ्याचा किंवा अन्य कुठलाही ... राजकीय ठिणगी पडतेच.. आणि मग काय.. तुम्ही आमच्यावर आरोप करा.. आम्ही तुमच्यावर आरोप करतो.. तुम्ही मारल्यासारखं करा.. आम्ही लागल्यासारखं करु.. एकच गदारोळ... थोडे दिवस जातात.. आणि मग परत ऑल इज वेल... हेच सगळं सुरु राहातं ... 

पण कालपासून जे घडतंय ... ते नेत्यांसाठी याच नेहमीच्या आरोप, प्रत्यारोप, चिखलफेकीचा भाग असला तरी महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी हे त्याच्या पलीकडचे आहे....  राजकारणाचा किती चिखल झालाय हे दाखवून देणारं आहे. 

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची एबीपी माझाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी दिल्लीत सुरु असलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुलाखत घेतली.. त्यात नीलम गोऱ्हेंनी लिहिलेल्या पुस्तकांसोबत अनेक गोष्टींवर प्रश्नोत्तरं झाली.. पण प्रश्न जेव्हा राजकारणाकडे वळला.. तेव्हा नीलम गोऱ्हेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करत असतानाच एक गंभीर आरोप केला.. तो होता.. उद्धव ठाकरेंवर....



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola