Zero Hour | नॅशनल हेरॉल्ड केसची देशभरात चर्चा, आर्थिक लाभासाठी कायद्याचं उल्लंघन?

Zero Hour | नॅशनल हेरॉल्ड केसची देशभरात चर्चा, आर्थिक लाभासाठी कायद्याचं उल्लंघन?

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. 'नॅशनल हेराल्ड' या वृत्तपत्राशी निगडीत एका मनी लॉन्ड्रींग खटल्यासंदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.  ईडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रानंतर काँग्रेसने 'हे सूडाचं राजकारण असून पंतप्रधान आणि गृहमंत्री धमकावत असल्याचा' आरोप केला आहे.  पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ईडीने या प्रकरणाशी निगडीत तपास केल्यानंतर काँग्रेसच्या या दोन वरिष्ठ नेत्यांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे.  9 एप्रिल रोजी दाखल केलेल्या या आरोपपत्राची विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी दखल घेतली आणि 25 एप्रिल रोजी खटल्याच्या सुनावणीची तारीख निश्चित केली.  या चार्जशीटमध्ये काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि राजीव गांधी फाउंडेशनचे ट्रस्टी सुमन दुबे यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.  या महिन्याच्या सुरुवातीलाच ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड अर्थात एजेएलची 661 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola