Zero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?
Special Report Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?
मंडळी नागपुरात जिथं विस्तारीकरणामुळं शेकडो झाडं धोक्यात आलीयत.. तिथं उद्या कदाचित विस्तारीकरणही होईल.. नव्या इमारती होतील.. पण, शहराचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.. हेही तितकंच खरंय.. नागपुरातून आता जाऊयात पुण्यात..
रस्त्यांवर पडलेले खड्डे हा मुद्दा पुणेकरांसाठी आता काही नवा राहिलेला नाही.. म्हणजे पुणेकरांनी बहुतेक खड्ड्यांसोबत प्रवास करणं.. हा जगण्याचाच भाग म्हणून मान्य केला असं म्हटलं तर फार चुकीचं ठरणार नाही..
बरं, ही काही आजचीच समस्या आहे असंही नाही.. गेल्या अनेक वर्षापासून.. ही समस्या आहेच.. एखादा रस्ता बरा म्हणावा.. तोच त्याला कुठे ना कुठे विकासकामांसाठी खोदल्याचं दिसतं.. आता हेच बघा ना.. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली मॉडर्न कॉलनी... तसंच जंगली महाराज रोड असो किंवा आपटे रोड.. इथल्या चांगल्या म्हटल्या जाणाऱ्या रस्त्यांची आज काय स्थिती आहे... आणि त्याचा काय परिणाम होतोय. पाहूयात... पुणे महापालिकेचा महामुद्दा.