Zero Hour : हाकेंच्या उपोषणावर मार्ग निघणार ? सरकारच्या बैठकीत काय घडलं ?

Continues below advertisement

Zero Hour : हाकेंच्या उपोषणावर मार्ग निघणार ? सरकारच्या बैठकीत काय घडलं ?

सामाजिक आणि राजकीय स्थितीचं विश्लेषण करणार आहोत.. कारण, आजही महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी... असा संघर्ष पेटतो की काय...? अशी भीती निर्माण झालीय.. त्यातल्याच ओबीसी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत अत्यंत महत्वाची बैठक पार पडलीय.. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत काय काय झालं.. हे जाणून घेणार आहोत...त्याचं विश्लेषण करणार आहोत.. 
खरंतर आज, महाराष्ट्रात बदललेल्या स्वरुपात का होईना... गेल्यावर्षी सुरु झालेलं मराठा आरक्षण आंदोलन आजही सुरु आहे... त्याच्याविरोधात ओबीसी समाजानं गेल्या दहा दिवसांपासून कठोर आंदोलन सुरु आहे.. त्याचं नेतृत्व करतायेत प्राध्यापक लक्ष्मण हाके... जे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणावर आहेत..
आणि त्यामुळेच वडीगोद्रीत सुरु असलेलं ओबीसी आंदोलन राज्यभरात पोहोचलं.. त्यावरच तोगडा काढण्यासाठी आज सकाळी पाऊणे नऊ वाजता सरकारचा शिष्टमंडळ वडीगोद्रीत दाखल झालं.. खरं तर काल झिरो अवरमध्ये लक्ष्मण हाके आले असताना त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला भेटायची इच्छा नाही असे म्हटले होते ...जर उपोषण सोडवायचे असेल तर हवे असलेले आश्वासने लेखी आणावे असे हि त्यांनी म्हटले होते ... आज सरकारचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन... त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, अतुल सावे, ओबीसी नेते गोपीचंद पडळकर, खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर हे पोहचले ...पण लेखी आश्वासन आले नाही. त्यामुळे उपोषण सुटले नाही ... पण हि सगळी नेते मंडळी आणि लक्ष्मण हाके यांच्यात सव्वा तास चर्चा झाली.. चर्चा सुरु असतानाच मंचासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली...
मग, तासभराच्या चर्चेत गिरीश महाजनांनी लक्ष्मण हाकेंची आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करुन दिली.. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करत.. लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा घडवून आणली.. आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण दिलं... त्यानंतर लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ नियोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालं... त्यांच्यासोबत ओबीसी आरक्षण बचाव समितीचे इतर सहा सदस्य देखील होते.. तर सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार.. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, संजय बनसोडे, पंकजा मुंडे हजर होते...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram