Zero Hour Gust center With Sushil Kulkarni : भाजपची समर्थकांना नोटीस, नव्या वादाला सुरुवात
Continues below advertisement
कत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची जोरदार पिछेहाट झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीला रोखण्यात भाजप सपशेल अपयशी ठरली तसेच स्वतःच्या हक्काच्या जागा सुद्धा भाजपला गमवाव्या लागल्या त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. यातच आता भाजपचे सोशल मीडिया सांभाळणारे पदाधिकारी आणि भाजपचे सोशल मीडियावरील समर्थक यांच्यात वाद पेटला आहे.
Continues below advertisement