Zero Hour Guest Rohit Pawar : जय पवार बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात? रोहित पवार काय म्हणाले?
लाडका दादा... म्हणून गेल्या महिन्याभरात... गुलाबी जॅकेट परिधान करत... अजित पवारांनी एक वेगळीच हवा केलीय... महायुती सरकारच्या याच लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय.. पण, दादा आज चर्चेत आले... ते त्यांच्या अत्यंत महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या विधानानं...
स्थळ होतं... पुणे...
कार्यक्रम... स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं होणारं ध्वजारोहण...
प्रश्न होता बारामतीच्या लढतीबाबत .... दादांच्या बारामतीतून काही कार्यकर्ते जय अजित पवारांचे नाव पुढे करत असल्याचा प्रश्न ...
दादांचं उत्तर महाराष्ट्राला अनपेक्षित होतं ... दादा म्हणले.... जय पवारांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षाचा संसदीय बोर्ड निर्णय घेईल.. आणि मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी बारामतीतून सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलोय... त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू...
अजित पवार... बोलातायेत बारामती विधानसभेसंदर्भात... त्यामुळे प्रत्येकालाच धक्का बसलाय.. की अजित पवार बारामती मतदारसंघ सोडणार?
खरंतर, बारामती म्हंटलं की जसं शरद पवार डोळ्यासमोर येतात... तसं बारामती विधानसभा म्हंटलं की फक्त आणि फक्त अजित पवारच डोळ्यासमोर येतात.. 1967 ते 1990 असं 23 वर्ष या बारामती विधानसभेतून शरद पवार आमदार होते... आणि त्यांच्यानंतर 1991 साली मतदारसंघ अजित पवारांच्या खांद्यावर आला.. तो आज 33 वर्षांनंतरही त्यांच्याकडेच आहे..
बरं, तीन दशकांपासूनच अजित दादांनी फक्त विजय मिळवला नाहीय.. तर प्रत्येकवेळी विजयी मताधिक्यात ऐतिहासिक वाढही केलीय