Zero Hour Guest Centre Dilip Khristi | दसरा मेळाव्यात बहीण भावाची ताकद एकत्र येणार!
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आजही बैठक संपन्न झाली, मात्र मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावर बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे, आता लवकरच आचारसंहिता जाहीर होईल. पण, मराठा समाजाला आोबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच, पहिल्यांच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा दसरा मेळावा होणार आहे.या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली